जळगाव प्रतिनिधी । मोबाईल सिम कार्ड बंद होत असल्याची बतावणी करून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी ॲपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने भुसावळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघडकीला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गणेश लक्ष्मण नेमाडे (वय-६०) रा. भुसावळ हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉटसॲपवर बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होत असून सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा असा मॅसेज आला. त्यानुसार नेमाडे यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला असता आपण बीएसएसएन कंपनीतून बोलत असल्याची अनोळखी व्यक्तीने बतावणी केली आणि आपले सिमकार्ड बंद होणार असून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने प्ले स्टेअरमधून एक ॲप डाऊललोड करण्यास सांगितले. त्या ॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने नेमाडे यांच्या मोबाईलचे ऑनलाईन नियंत्रण मिळविले. त्यानुसर नेमाडे यांच्या एसबीआय बँकेच्या खातू तब्बत ७ लाख २० हजार रूपये काढून घेतले व फोन कट केला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे कळताच नेमाडे यांनी जळगावातील सायबर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.