जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी ७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून यात विविध गावांमधील कामांचा समावेश आहे.
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव व धरणगाव तालुक्यातील १०५ गावांत मुलभूत सुविधा योजनेतून ग्रामविकास मंत्रालयातर्फे ७ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यात १२१ हायमास्ट लॅम्प व ७० सोलर पथदिवे लावले जाणार आहेत. याशिवाय या कामांमध्ये बैठक हॉल बांधकाम, सामाजिक सभागृह , व्यायामशाळा बांधकाम, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण, संरक्षण भिंत, वाचनालय, पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ते काँक्रीटीकरण आदींचा समावेश आहे.
जळगाव तालुक्यातील ५७ गावांमध्ये ७६ कामांसाठी २ कोटी कोटी ८३ लाख तर धरणगाव तालुक्यात ४८ गावांसाठी ५६ कामांकरिता २ कोटी १७ लक्ष असा एकूण १०५ गावांत १३२ कामांसाठी ५ कोटी निधी मंजुर केला आहे. जळगाव तालुक्यातील ४६ गावांत ६३ मिनी हायमास्ट लॅम्प व ३० सोलर पथदिवे, धरणगाव तालुक्यातील ५९ गावांत ५८ मिनी हायमास्ट लॅम्प व ४० सोलर पथदिवे मंजुर केले आहे. विशेष बाब म्हणजे धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे श्री सदस्यांसाठी रश्रीं१४७श्री बैठक हॉलफ बांधकामासाठी ३६ लक्ष मंजुर करण्यात आले आहे. जळगाव मतदार संघात अंजनविहिरे, खामखेडा, जांभोरा, कानळदा, खामखेडा, ममुराबाद, विटनेर, भोणे, तरडे व पिलखेडा येथे सामाजिक सभागृह, वाघळूद बु येथे वाचनालय, नंदगाव व खापरखेडा येथे संरक्षणभिंत, शिरसोली व पाळधी येथे श्री बैठक हॉल उभारण्यात येणार आहे.