जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात काल प्रमाणेच आजही ६०५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून आजच ५२९ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आज जिल्ह्यात जळगाव व एरंडोलमध्ये संसर्ग कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १२९ रूग्ण हे मुक्ताईनगर तालुक्यात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अनेक तालुक्यांमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-११८; जळगाव ग्रामीण-५४; भुसावळ-४६; अमळनेर-१९; चोपडा-५०; पाचोरा-२३; भडगाव-१; धरणगाव-१६; यावल-२९; एरंडोल-५३; जामनेर-६; रावेर-९; पारोळा-१४; चाळीसगाव-३०; मुक्ताईनगर-१२९; बोदवड-४ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ६०५ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-५२३८; जळगाव ग्रामीण-१२४९; भुसावळ-१२६७; अमळनेर-१८१५; चोपडा-१८४०; पाचोरा-९२७; भडगाव-१०६६; धरणगाव-१०९५; यावल-७८३; एरंडोल-१३७९; जामनेर-१४२४; रावेर-११६५; पारोळा-१०३०; चाळीसगाव-१३९८; मुक्ताईनगर-७४४; बोदवड-३४१ व दुसर्या जिल्ह्यांमधील १२२ असे एकुण २२ हजार ९२३
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २२ हजार ९२३ इतकी झालेली आहे. यातील १५ हजार ९८२ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५२९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७३७ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६२०४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews