जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार मधील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौक दरम्यान पायी जात असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ६० हजार रुपयांची रोकड व बँकेचे चेकबुक व पासबुक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जहर अली वजीर अली सय्यद वय-८०, रा. सालार नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील फुले मार्केट येथे कामाच्या निमित्ताने आलेल्या होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पिशवीत 60 हजार रुपयांची रोकड बँकेचे चेकबुक पासबुक ठेवलेले होते. दरम्यान दाणा बाजार मधील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौक दरम्यान पायी जात असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवी ठेवलेले ६० हजार रुपयांची रोकड, पेन्शनचे पुस्तक, बँकेचे चेक बुक आणि पासबुक असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान रोकडची चोरी झाल्यानंतर हतबल झालेले जहूर अली यांनी चोरट्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु याबाबत कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.