हिमाचलमधील काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या निवडणूकीत भाजप नेत्यांना क्रॉस मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याव्यतिरिक्त तीन अपक्ष आमदारांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश २३ मार्च शनिवार रोजी दिल्लीत झाला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचा पक्षात प्रवेश घडवला. या आमदारांमध्ये सुजानपूरमधून राजेंद्र राणा, धर्मशालामधून सुधीर शर्मा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, बडसरमधून इंद्रदत्त लखनपाल, कुतलाहारमधून देवेंद्र कुमार भुट्टो आणि गाग्रेटमधून चैतन्य शर्मा आणि अपक्षांमध्ये देहरामधून होशियार सिंग, नालागढमधून केएल ठाकूर आणि हमीरपूरमधून केएल ठाकूर यांचा समावेश आहे. आशिष शर्मा यांचा समावेश आहे.

हिमाचलमध्ये २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अभिषेक सिंघवी यांना तर भाजपने हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे स्वतःचे ४० आमदार होते आणि तीन अपक्षही राज्यसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस सरकारचे सहकारी म्हणून काम करत होते. पण यातील काँग्रेसच्या ६ आणि अपक्षांच्या ३ आमदारांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना क्राँस मतदान केले. हर्ष महाजन यांना बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने ३४ मते घेतली. त्यानंतर लॉटरी पध्दतीने ते विजयी झाली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक सिंघवी यांचा पराभव झाला. यानंतर, २८ फेब्रुवारी रोजी हिमाचल विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी क्रॉस व्होटिंगसाठी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवले. यानंतर ४ मार्च रोजी बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

१८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. या दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने अपात्र आमदारांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुक घेण्याची घोषणा केली. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यावर या सर्व सहा आमदारांना भाजपने पोटनिवडणूकीच्या जागेवर आपल्या पक्षाची उमेदवारी दिली आहे.

Protected Content