जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोडवरील गिताई नगर येथील तरूणाचे बंद घर फोडून ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुपडू गुलाब सोनवणे वय ४० रा. गिताईनगर, जुना खेडी रोड, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कोल्ड्रिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. चोपडा येथील नातेवाईकांकडे लग्न असल्याने शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सुपडू सोनवणे यांनी घर बंद करून गावाला निघून गेले होते. यावेळी घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ते घरी आले तेव्हा उघडकीला. त्यांनी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार परिष जाधव हे करीत आहे.