५८ व्या वाढदिवसानिमित्त ५८ किलोमीटर सायकलींग : प्रतापराव पाटलांचा अनोखा ‘बर्थ डे’ !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी आपल्या ५८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ४ ऑगस्ट रोजी चतुर्थी निमित्त सकाळी ५.३० वाजता गणपती नगरातून ते पद्मालयपर्यंत सायकल राईड करण्यात आले. त्यांच्यासमवेत १०० हून अधिक सायकलिस्टांनी सहभाग नोंदवून अनोखा “बर्थ डे” साजरा करण्यात आला.

जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त ५८ किलोमीटर आणि ५८ सायकलिस्ट मित्रांसोबत करण्याचा संकल्प केला होता. परंतू या सायकल रॅलीत १०० हून अधिक सायकलिस्टांनी सहभाग नोंदविल्याचे पहायला मिळाले. ही सायकल राई राठी सायकल मार्टच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मनोगतात जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, “मी ही सायकलिंगची जी चळवळ सुरू केली आहे, ती अशीच पुढे वाढत राहावी आणि जास्तीत जास्त नागरीक, तरूण, तरूणी आणि इतरांनी यामध्ये सहभागी व्हावेत. तसेच पर्यावरणाचे संरक्षण करावे.” असे आवाहन केले.

यांनी नोंदविला सहभाग

सायकल रॅलीसाठी जळगावहून ५८ अधिक सायकलीस्ट, पाचोरा येथून पोलीस उपअधिक्षक येरूळे सर व त्यांचे सहकारी, जामनेर, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव येथील सायकलीस्ट मित्रांनी सहभाग नोंदविला होता. सायकल राईड मध्ये सहभागी झालेल्या रायडर्सना राठी सायकल मॉलचे संचालक गेंदालाल राठी व मुकेश राठी यांच्याकडुन टी-शर्ट व पद्मालय येथे अल्पोपहार देण्यात आला होता. प्रतापराव पाटील ह्यांच्या सहकार्यानेच ही रॅली यशस्वी झाली त्याबद्दल गेंदालाल आणि मुकेश राठी सर्वांचे आभार मानले.

 

Protected Content