जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात तब्बल ५२० नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील १५४ रूग्णांचा समावेश आहे. एकाच दिवसात पहिल्यांदाच पाचशेच्या पार रूग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ५२० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १५४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून त्या खालोखाल जामनेर-७१, चाळीसगाव-५५ रूग्ण आढळले आहे. तर उर्वरित जळगाव ग्रामीण- ३९, भुसावळ-१७, अमळनेर-३४, चोपडा-१३, पाचोरा-११, भडगाव-१६, धरणगाव-०६, यावल-१३, एरंडोल-४०, रावेर-०७, पारोळा-११, मुक्ताईनगर-२५, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण ५२० रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ३६९७, जळगाव ग्रामीण-७४५, भुसावळ-१०४९, अमळनेर-१०८९, चोपडा-१०८०, पाचोरा-५९९, भडगाव-६४२, धरणगाव-६६४, यावल-५४०, एरंडोल-७८८, जामनेर-१०८६, रावेर-७८५, पारोळा-६०१, चाळीसगाव-७०५, मुक्ताईनगर-४६३, बोदवड-२६६, इतर जिल्हे-६४ असे एकुण १४ हजार ८६३ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १४ हजार ८६३ इतकी झाली आहे. यातील १० हजार ३०५ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच ४३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६१३ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ९४२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.
जिल्ह्यात आजवर एकाच दिवसात तीनशे व चारशेच्या पेक्षा जास्त पेशंट आढळून आले असले तरी मात्र पहिल्यांदा पाचशेपेक्षा जास्त रूग्ण आढळून आल्याचे आज दिसून आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी प्रयत्नपूर्वक चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पेशंटची संख्या देखील वाढली आहे. त्यांनी याबाबत आधीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती दिली होती. यातील दुसरा आयाम हा रूग्ण बरे होण्याचा आहे. जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण बरे होण्याची वेग वाढल्याची बाब समाधानकारक आहे. आज जिल्ह्यात नवीन ५२० रूग्ण आढळून आले असले तरी आजच ४३२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची बाब ही दिलासा देणारी आहे हे निश्चीत.