पाचोरा प्रतिनिधी । शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे ५२ कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला असून यात रस्त्यांच्या कामांसाठी ४४ कोटी रुपये, ओपन प्लेस सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये व शहरातील विविध परिसरात सोलर पथदिवे लावण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांचे ई-टेंडर काढण्यात येवुन या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी बोलतांना सांगितले की, शहरातील भुयारी मार्ग ते सिंधी कॉलनी पर्यंतच्या विविध काॅलनी भागातील तसेच नगरपालिकेपासुन ते स्मशानभूमी पर्यंतच्या विविध काॅलनीतील रस्त्यांच्या कामांसाठी ४४ कोटी रुपये निधी, शहरातील ३५ ओपन प्लेसचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ५ कोटी रुपये व शहरातील विविध ठिकाणी सोलर पथदिवे लावण्यासाठी ३ कोटी रुपये अशा सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून या कामांचे लवकरच ई – टेंडर काढण्यात येणार असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, आनंद पगारे, राम केसवानी, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, संदिपराजे पाटील, भुषण पेंढारकर उपस्थित होते.