अवैध वाळू वाहतुकीचे ३ ट्रॅक्टर्स पकडले

 

रावेर  : प्रतिनिधी । महसूल विभाग एक्शन मोडवर असून आज एकाच दिवशी तिन अवैध वाळू वाहतूक करणा-या  ट्रक्टर-ट्रॉलीचालकांवर  धडाकेबाज कारवाई केली आहे.

 

ऐनपुरचे  मंडळ अधिकारी शेलकर व  खिरवड  आणि  थेरोळचे  तलाठी , कोतवाल यांच्या पथकाने आज सकाळी  विनापरवाना अवैध वाळु वाहतूक करतांना एमएच २८ टी ६६३५ व  एमएच १९ सिझे ६६८७ क्रमांकाचे ट्रॅक्टर्स पातोंडी नजिक पकडून तहसील कार्यालयात जमा करून  पंचनाम्यानंतर  जप्त  केले आहे.  तिसरे अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर-ट्रॉली  खानापुरनजिक पकडले असून त्यांच्या नंबर  नेमका माहिती नसल्याचे  महसूल विभागाकडून सांगण्यात येत होते

 

Protected Content