जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेणुका नगर येथे राहणाऱ्या खासगी वाहन चालकाचे बंद घर फोडून घरातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या संदर्भात गुरुवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र पुंडलिक पाटील वय-४९ रा. रेणुका नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांच्या खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांनी आणण्याचे काम करतात २३ ते २५ डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ८.३०वाजता ते घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले. घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. याप्रकरणी गुरुवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहे.