भुसावळ, प्रतिनिधी | गृहनिर्माण विकास महामंडळाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यभरात घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून १०० गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज साकारण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून भुसावळमध्ये ५ हजार घरांना मान्यता मिळाली आहे. याबाबत आ. संजय सावकारे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’सी बोलतांना माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरी’ या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी भागात राबविण्यात येणार असून महाराष्ट्रासाठी १४ लाख ४० हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१८ मध्ये गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करून डिसेंबर २०१९ पर्यंत ५ लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुषंगाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ५ हजार ग्रुह प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. हा गृहप्रकल्प योजनेअंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या अनुदानातून भूखंड खरेदी करण्यात येईल व त्यावर हा प्रकल्प राबवण्यात येईल याचा फायदा पात्र नसलेल्या लाभार्थी नाही होऊ शकेल.