चुंचाळे येथे कार्तिक दिंडीस प्रारंभ

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे गावात असलेल्या सुकनाथ बाबांच्या पावन भुमीत सालाबादा प्रमाणे श्री समर्थ वासुदेव बाबा वारकरी मंडळ व भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांतर्फे कोजागिरी पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिक दिंडीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झालीय. 

यावर्षीही कार्तिक दिंडीला प्रारंभ झाला असुन दिंडी सकाळी ४:३० वाजता सुकनाथ बाबा मंदिरावरुन आरती करून निघून संपुर्ण गावातून हरिनामाचा गजर गात सुकनाथ बाबा मंदिरात परत येऊन काकडा आरती करुन तिथेच दिंडीची सांगता केली जाते. दिंडी एक महिना चालत असते. महिला सकाळी पहाटेच्यावेळी घरासमोर सडा रांगोळी तसेच जागोजागी तुळशी वृंदावन ठेवून दिवे लावून पूजा करून दिंडीचे स्वागत करतात. त्यामुळे संपूर्ण चुंचाळे परीसरात धार्मिक व चैतन्यमय वातावरण निर्माण होते. यावेळी दिडीत ह.भ.पा.प्रल्हाद पाटील, अरुण कोळी, मनोहर कोळी, किरण तेली, संजय चौधरी, प्रमोद तेली, प्रशांत राजपुत यासह लहान बालक मोठ्या सख्येन उपस्थित असतात.

 

Protected Content