प्रहार विद्यार्थी आघाडी भडगावतर्फे कोकणात जाऊन पूरग्रस्तांना मदत

भडगाव, प्रतिनिधी ।  कोकणात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बेघर होऊन संकटात असलेल्यांना प्रहार विध्यार्थी आघाडीतर्फे प्रत्यक्ष कोकणात जावून आवश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. 

 

कोकणातील पूरग्रस्त नागरिकांचे फक्त सांत्वन न करता प्रत्यक्ष मदत करून अश्रू पुसण्याचे मार्गदर्शन प्रहारचे संस्थापक बच्चु  कडू, महाराष्ट्र प्रहार कार्यध्यक्ष बलुभाऊ जवंजाळ यांनी केले होते. त्या मार्गदर्शनाप्रमाणे व प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, तालुका प्रमुख प्रशांत पाटील, सरचिटणीस देवा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार विद्यार्थी आघाडी भडगाव यांनी पूरग्रस्तांसाठी अहोरात्र फिरून एक ट्रक भरून आवश्यक साहित्य जमवून  १८ प्रहार सैनिकासह गाडी पाठविण्यात आली होती.  गाडीची पूजा किसान संस्थेचे अध्यक्ष प्रताप हरी पाटील यांचे हस्ते करून आणि सौरभ पाटील, रवी पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडीने प्रस्थान केले.  मदतीमध्ये १ हजार खाण्याचे कीट व त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, दादर, यांचे तयार पीठ, तांदूळ, डाळी, मीठ, साखर, चहा पावडर, बिस्कीट, नमकिन, चिवडा पाकीट, टूथपेस्ट तसेच बिसलेरी पाण्याचे १५० ते २०० बॉक्ससह जुने आणि नवे कपडे, चादरी, रुमाल, वैगेरे साहित्य सोबत घेवून प्रत्यक्ष कोकणातील महाड तालुक्यातील पोलादपूर, खेड, सह महाड शहरातील शिवाजी चौक येथे प्रत्यक्ष नागरिकांच्या हाती देवून वाटप केले. उरलेले मदत साहित्य महाड नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.  प्रहार विद्यार्थी आघाडीचे शुभम भोसले यांनी सांगितले की, अतिशय भयावह परिस्थिती असून त्या ठिकाणचे असंख्य नागरिक अक्षरशः देवा सारखी मदतीची वाट पाहताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे गावात रस्त्यांवर, घरात, गावात चिखल आहे.  दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कटून गेले आहे. मदत घेताना कोण मोठा कोण छोटा हे विसरून सर्व अक्षरशः भर पावसात सुद्धा एका लाईनीत मदत घेत होते. कोणी मोठा, कोणी छोटा नाही हे मात्र निसर्गाने सिद्ध केले आहे. नागरिकांचे हाल आणि सर्व दृश्य  पाहिल्यावर डोळे पाणावले शिवाय राहत नाही. या सर्व मदतीसाठीभडगाव प्रहार विद्यार्थी आघाडीचे शुभम भोसले, पुणे जिल्हासंघटक निरज कडु,  शहरउपाध्यक्ष रोहीत भोसले,  पुणे महिलाध्यक्ष मिना भोसले,  संदीप जाधव, जयदीप अहिरराव, गोलू राजपूत, अक्षय चांदगुडे, सचिन कोळी, निरज खैरनार, पवन पाटील, सागर पाटील, भूषण सोनवणे, सौरभ भोसले, तेजस देवरे, सागर भोसले, सागर देवरे, गुड्डू सोनवणे, दीपक पाटील, सुमेध सोनवणे, भूषण चौधरी, राकेश पाटील, उमेश कोळी, मुकेश सोनवणे, दुर्गेश गाडगे, सिद्धांत सुराणा, भावेश पाटील, मनीष चोरडिया, स्वप्नील सोनवणे, संकेत मराठे, प्रफुल पाटील, परिक्षित पाटील, शुभम निकुंभ, विनोद पाटील, राज पाटील, यश पाटील, निशांत सोमवंशी, यशराज गोकल, राजन भोसले, आकाश बागल, विशाल शिंदे या प्रहार सैनिकांनी अथक परिश्रम घेवून भर पावसात सुद्धा मदत वाटप केली.

 

Protected Content