५० लाखाच्या अपसंपदा प्रकरणी गुन्हा ; ग.स.च्या माजी अध्यक्षांसह एकाला अटक

anti corruption red stamp text clip art vector csp33255861

 

जळगाव (प्रतिनिधी) संगनमत करून तब्बल ५० लाखाची अपसंपदा बँकेत ठेवून बनावट दस्तऐवजाच्या साह्याने काढल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाने आज गुन्हा दाखल करत ग.स.च्या माजी अध्यक्षांसह एका संशयिताला अटक केली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, सुनिल अभिमन सूर्यवंशी (रा. हर्ष रेसिडेन्सी, फ्लॅट नं.03, अजय कॉलनी,रिंग रोड) हे जिल्हा परिषदमध्ये कक्ष अधिकारी होते. तसेच सूर्यवंशी हे जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे अध्यक्ष देखील होते. सूर्यवंशी यांनी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किरण भीमराव पाटील (रा. उषाकिरण अपार्टमेंट, श्रीकृष्ण कॉलनी) यांच्यासोबत संगनमत करत पतसंस्थेचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नावावर बनावट खाते उघडुन उघडले. त्यानंतर अपसंपादीत बेहिशोबी ५०,००,००० रुपये अष्टचक्र ठेवीत ठेवुन नंतर व्याजासह सदर रक्कम बनावट दस्तऐवज तयार करून काढुन घेतली होती. याप्रकरणी आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाच लुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर हे करीत आहे.

Protected Content