भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस दलातील नोकरी करताना कामकाजात पारदर्शकता ठेवून गुन्ह्यांची निर्गती, डिटेक्शन, सीसीटीएनएस प्रणालीत अचूक कामगिरी व वाहतूक नियम मोडणार्या वाहधारकांविरोधात धडक कारवाई करणार्या भुसावळ विभागातील पाच पोलिस कर्मचार्यांचा ‘पोलिस स्टेशन एम्प्लाई ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून सांघिक भावना वाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमामुळे पोलिस कर्मचार्यांचा कामाप्रती हुरूप अधिक वाढला आहे.
ऑक्टोबर 2023 महिन्यासाठी भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल शेख जावेद शेख मजीद, बाजारपेठचे कॉन्स्टेबल सचिन यशवंत चौधरी, तालुक्याचे हवालदार संजय आत्माराम तायडे, नशिराबादचे कॉन्स्टेबल हेमंत प्रकाश मिटकरी, शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल दिनेश संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या कर्मचार्यांनी अनुक्रमे गुन्हे साबीत करणे, दुचाकी चोरींचे गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यांचा निपटारा करण्यास मदत व एमपीडीए तयार करणे, क्राईम कामकाज अद्यावत, गुन्ह्यांची निर्गती तसेच सीसीटीएनएस प्रणाली अद्यावत ठेवणे व मोटार व्हेईकल अॅक्टच्या केसेस सर्वाधिक केल्याने त्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्यानंतर त्यांना अधिकार्यांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.
दरम्यान, हवालदार सुरज पाटील यांनी ५ हजार ३४० किलो बनावट खवा पकडल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, दुय्यम अधिकारी व 70 अंमलदार उपस्थित होते.