Home आरोग्य सावदा येथे नवीन ५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

सावदा येथे नवीन ५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह


सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । गेल्या चार दिवसांपासून शहरात ॲन्टीजन टेस्टद्वारे संशयित रूग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. यात आज झालेल्या तपासणीत ५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून ॲन्टीजन टेस्टद्वारे संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे. आजपर्यंत एकुण ३११ जणांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आलेत. आज १०८ रूग्णांची तपासणी करण्यात आली असून यात ५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे.

आढळून आलेल्या रूग्ण गवत बाजार, प्लॉट एरिया, देवकर वाडा आणि मुख्य रस्ता या परिसरातील आहे. सावदा शहरात एकुण रूग्ण संख्या १२२ झाली असून यापैकी ८९ रूग्ण बरे होवून घरी पाठविण्यात आलेत. तर १० रूग्णांचा मृत्यू झालाय आणि २३ जणांवर उपचार सुरू आहे. यावृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound