नवी दिल्ली । कोरोनाचे भयंकर साईड इफेक्ट आता दिसू लागले असून या अनुषंगाने फक्त जुलै महिन्यातच ५० लाख लोकांच्या नोकर्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकीकडे रोजगार स्थिती सुधारल्याचे दावे होत असतानाच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने म्हणजेच सीएमआयआरने धक्कादायक आकडेवारी जाहीर आहे. यानुसार जुलै महिन्यात ५० लाख नोकरदार लोकांच्या नोकरीवर गदा आली आहे. ज्यामुळे आत्तापर्यंत नोकरदार वर्गातील नोकरी गमावणार्यांची संख्या ही १ कोटी ८९ लाख इतकी झाली आहे.
या माहितीनुसार १ कोटी ७७ लाख लोकांच्या नोकर्या या एप्रिल २०२० या महिन्यात गेल्याची माहिती समोर आली. तर १ लाख लोकांच्या नोकर्या या मे महिन्यात गेल्या आहे. जून महिन्यात ३९ लाख लोकांना नोकर्या मिळाल्या. मात्र जुलै महिन्यात नोकर्या जाणार्यांची संख्या ५० लाखांवर पोहचली असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राने दिले आहे.
खरं तर, एप्रिल महिन्यात १२ कोटींपेक्षा जास्त नोकर्या जातील अशी भीती सीएमआयआरने वर्तवली होती. मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मात्र या सगळ्याचा गंभीर परिणाम हा अनेक क्षेत्रांवर झाला. या अनुषंगाने जुलै महिन्यात ५० लाख नोकर्या गेल्या आहेत हे स्पष्ट झालं आहे.