जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी भागातील प्रभा पॉलिमर या प्लास्टिक उत्पादक कंपनीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ मेट्रीक टन प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे.
एमआयडीसी भागातील व्ही ११४ प्रभा पॉलिमर कंपनीत प्लास्टिक उत्पादन होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस.एम.कुरमाडे, पी.एन.वांडे, टी.एन. ठाकरे यांच्या पथकाने प्रभा पॉलिमर कंपनीची तपासणी केली. तपासणीमध्ये कंपनीत मोठ्याप्रमाणावर प्लॉस्टिक आढळून आले. संबधित कंपनी मालक संजय विभांडीक यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ५ मेट्रीक टन प्लॉस्टिकची जप्ती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच जप्त केलेला माल मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाच्या सहाय्याने बालगंर्धव नाट्यगृहात जमा करण्यात आला आहे.