Home क्राईम भाविकांच्या गर्दीत सोन्याची पोत चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

भाविकांच्या गर्दीत सोन्याची पोत चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

0
65
chor mahila
chor mahila


chor mahila

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा होळ येथे गुरूपौर्णिमानिमित्तने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडले आहे. याबाबत पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा होळ येथील इंद्रदेव महाराज आश्रम शाळेत गुरूपौर्णिमा निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दीचा फायदा घेत महिलांची गळ्यातील सोन्याची पोत चोरी करत असतांना पारोळा येथील महिला पोलीसांनी दोन महिलांना अटक केली. तारा पोपट गायकवाड (वय-39) आणि उषा विजय गायकवाड (वय-45) दोन्ही रा. नांदूर ता. गेवराई जि. बीड असे दोघा महिलांची नावे आहेत. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील दोन सोन्याच्या पोत आणि 1 सोन्याची चैन वस्तू हस्तगत केल्या आहेत. पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे यांनी कारवाई केली. दोघांविरोधात पारोळा पोलीसात चोरीकेल्याप्ररकणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ.प्रकाश चौधरी, पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे करीत आहेत.


Protected Content

Play sound