जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स मार्केटमधील रोहिणी स्वीटमार्ट दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह २ मोबाईल असा ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून मिरची घटना गुरुवारी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुपराम केसाराम चौधरी (वय-३६, रा. गणेश कॉलनी, साई मंदिराजवळ जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स मध्ये रोहिणी स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा एकूण ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. प्रकरणी दुकान मालक अनुपराम केसाराम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.