धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ४१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण ४१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात पाळधी ब्रुद्रुक ४, खर्दे २, नांदेड २, पिंपळे सिम २, चमगाव २, पाळधी खुर्द २, कल्याणे खुर्द १, वाघळूद बुद्रुक १, बांभोरी प्रचा १, बोरखेडा १, बिलखेडा १, खामखेडा १, आनोरा १, पाळधी खुर्द २, जि. प. शाळा जवळ १, भावसार नगर १, लांडगे गल्ली १, मातोश्री नगर २,संजय नगर ३, कृष्ण गीता नगर १, रामलिला चौक १, देवकरण बांगला १, जुना रथ १, लहान माळी वाडा १, वाणी गल्ली ३, पारधी वाडा १, पद्मालय नगर १, लोहार गल्ली १, पेंढारे गल्ली १ असे एकूण ४१ कोरोनाबाधित रुग्ण आज तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत.
या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.