जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजातील सर्वात मोठी संस्था म्हणजे जळगावमधील मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्ट ही असून या संस्थेच्या विश्वस्तांची १५ ऑगस्ट गुरुवारी वार्षिक सर्वसाधारण सभा ईदगाह कार्यालया शेजारील नवीन हॉलमध्ये अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात एकूण १० ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले.
कब्रस्तान व इदगाह ट्रस्टची ही प्रथमता वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सर्वप्रथम अंजुम रिजवी यांच्या कुराण पठाणाने सभेची सुरुवात झाली. मानद सचिव फारुक शेख यांनी सभेची विषयपत्रिका सभेसमोर मांडली व व सभा सुरू करण्याची परवानगी घेऊन सभेला सुरुवात केली.
दहा विविध ठराव सर्वसंमतीने पारीत
●२०१८-१९ या वार्षिक अहवालाचे वाचन फारुक शेख यांनी केले असता त्यात काही दुरुस्तीसह तो अहवाल मंजूर करण्यात आला.
●२०१८-१९ च्या एकूण १९ लाख २६हजार ७७८ रुपयाच्या जमा खर्चाला मान्यता देण्यात आली.
●त्याप्रमाणे १९-२९ च्या ४२ लाख रुपयाच्या अंदाजपत्रकाला सुद्धा सर्वसंमतीने पारित करण्यात आले.
● १९-२० आर्थिक वर्षासाठी जेपीएल असोसिएट चार्टर्ड अकाउंटंट यांना स्थानिक हिशोब तपासणीस म्हणून मान्यता देण्यात आली.
● हल्ली अस्तित्वात असलेल्या ईद गाह मैदानाची जागा ही नमाज अपूर्ण पडत असल्याने तिचे विस्तारीकरण करणे बाबत चर्चा करून त्यासाठी वीस लाख रुपये खर्चाला व विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली.
●कब्रस्तानमध्ये दफनविधी झाल्यावर त्यावरील जागेवर कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम काम अथवा इतर काम करण्यास प्रतिबंध करण्याबाबत ठराव सुद्धा सर्वसंमतीने पारित करण्यात आला.
● कब्रस्तान मध्ये एक गेट व ईद गाह समोरील मार्गावर सौंदर्यीकरण करून बगीच्या निर्मितीला सुद्धा मान्यता देण्यात आली.
● अस्तित्वात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्यावर काही दुकाने, काही हॉल, तर डोरमेंटरी बांधण्याच्या या प्रस्तावाला मान्यता देऊन त्यात यात विविध प्रकारचे समाजपयोगी कार्य करण्यास मान्यता देण्यात आली.
सभेच्या कामकाजात यांनी घेतला सहभाग
सभा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत विविध विषयावरील चर्चेत अंजुम रिजवी, सय्यदचांद,आसिफखान, एडवोकेट इमरान, रिझवान जहागीरदार ,करीम सालार, डॉक्टर शरीफ, डॉक्टर सज्जद पटेल, अजमल खान, हुसेन मुलतानी ,अश्फाक पिंजारी, रज्जाक शा ,दानिश खान, जमील शेख ,शाहिद खान ,जिया बागवान,मीर नाझींम अली,आबिद पिंजारी,हुसेन मुलतानी,शकील बागवान,डॉ अमानउल्लाह शाह,आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला.
सभेत यांची होती उपस्थिती
अध्यक्ष गफ्फार मलिक, मानद सचिव फारुक शेख ,खजिनदार अश्फाक बागवान, उपाध्यक्ष सय्यद मुश्ताक अली ,रियाज बेग मिर्झा, सहसचिव मुकीम शेख व अनिस शाह, संचालक नजीर, खान, एडवोकेट सलीम शेख, ताहेर शेख, मोहम्मद इक्बाल बागवान ,मजहर खान, सय्यद सादिक सय्यद ,गुलाब फतेमोहम्मद, , नासीर पठाण मलिक शाकीर, खान शेर खान, मोहम्मद युनुस ,शेख तनवीर , नासिर खान, डॉक्टर जबी, नइम लकडावाला जाहीर डॉक्टर, शाहिद शब्बीर मोहसीन खान, इक्बाल खान ,अश्पाक मिर्झा, फारूक अयलेकार, शेख निसार, शेख शाकीर, ऐनुद्दीन अमिनुद्दिन, शेख अब्दुल सत्तार, करीब सद्दाम शेख, डॉक्टर सज्जाद अहमद पटेल, नाजिम अली ,शेख फरीद, शरीफ खान मोहम्मद खान, रज्जाक शाह, कासिम उमर, एडवोकेट अमीर शेख ,उमर शेख ,शेख रफीक, रेहान शेख ,निसार पटेल, जमील शेख, सैफुल्ला हबीबुल्ला, फारूक पटेल ,रियाज पटेल, गौस शेख, डॉक्टर जाहिद शाह, अश्फाक पिंजारी, एडवोकेट इमरान, मुफ्ती अतिक्, मलिक नाजमुद्दिन ,वसीम शेख, हुसेन मुलतानी , जकी पटेल, मोहम्मद वासिम ,सैफ अली, मोहम्मद रफी वसीम चौधरी , अब्दुल अजित आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी तर आभार सहसचिव अनिस शहा यानिं मानले
क्षणचित्रे
“●ट्रस्टची प्रथमताच वार्षिक सभा संपन्न .उपस्थित सभासदांनी नवीन कार्यकारणी चा अभिनंदनाचा ठराव पारित केला.
●नवीन कार्यकारणीच्या कार्याची नोंद जळगाव शहराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या मुस्लिमांनी घेतल्याचे उपस्थित सदस्यांनी आपक्या भावनाउ व्यक्त केल्यात.
●प्रथमच होत असलेल्या सभेची उस्तुकता प्रथम पासून तर शेवट पर्यंत होती.
● ही सभा नॉनस्टाप दोन तास चालली.