जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील जुने जळगाव येथील डॉ. आंबेडकर नगर येथे पिंपळाचे मोठे झाड घरावर कोसळून त्याखाली दोन घरे दाबले गेल्याची घटना मंगळवारी ४ जुन रोजी संध्याकाळी गेली. त्यात चार जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवारी ४ जुन रोजी संध्याकाळी जोरदार पाउसासह वादळी वारा जळगाव शहरात झाला. यावेळी शहरात भीतीदायी वातावरण झाले होते. सुप्रीम कॉलनीतील पार्टीशनच्या १० ते १४ घरात पाणी शिरले. तर जुने जळगाव येथील डॉ. आंबेडकर नगरात पिंपळाचे झाड घरांवर कोसळले. यात दोन घर दबली गेली. घटनेत चार जण जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेत विमलबाई अशोक भालेराव (वय ६०), चंदाबाई प्रभाकर सोनवणे (वय ६५), संगीताबाई भारत बोदडे (वय ५५), छकुली भारत सोनवणे (वय १९) हे जखमी झाले आहेत. घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी माहिती घेत होते.