सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर शहरालगत असलेल्या झरी ता.लोहा येथील खदानीच्या पाण्यात बुडून ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मृत झालेले चारही युवक हे देगलूरनाका नांदेड येथील रहिवाशी आहेत. विष्णुपुरी लगत असलेल्या झरी ता. लोहा येथे मोठी खदान आहे येथे पोहोचण्यासाठी व फिरण्यासाठी गेलेल्या देगलूर नाका नांदेड येथील चार युवकांचा पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना मंगळवारी सकाळी घडली. यात शेख शेख फुज्जाइल, सय्यद सिद्दिक, काजी मुजम्मिल, अफान अशी त्यांची नावे आहेत .
सदर घटनेमध्ये देगलूर नाका भागातील चौघेजणे झरी परिसरामध्ये फिरण्यासाठी म्हणून घरातून मंगळवारी सकाळी गेले होते. चौघांनाही पोहोता येत नव्हते. सुरुवातीला पाण्यामध्ये एक जण उतरला त्याला वाचण्यासाठी दुस-याने पाण्यात उडी मारली असे एकूण चौघेही पाण्यात उतरले मात्र एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह देगलूर नाका व झरी येथील नागरिकांसोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत. जवानांना सुरुवातीस दोन आणि नंतर काही वेळाने दोन अशी चौघांची मृतदेह आढळून आले आहेत. सदर घटनेबाबत सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.