शेअर मार्केटचे अमिष दाखवत व्यापाऱ्याची 34 लाखांची फसवणूक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटचे अमिष दाखवत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी तब्बल ३४ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, प्रशांत मोहनलाल अग्रवाल वय-५०, रा. शांतीनगर भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान १ जानेवारी 2024 रोजी त्यांना एका व्हाट्सअप वरून अनोळखी ज्योती नाव सांगणाऱ्या एका महिलेचा फोन आला. तिने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि तुम्हाला अधिक नफा मिळून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ३४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी प्रशांत अग्रवाल यांनी शुक्रवार १३ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्योती नाव सांगणाऱ्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

Protected Content