जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ३२१ नवीन रूग्ण आढळून आले असून यात जळगावसह एरंडोल तालुक्यातील रूग्ण सर्वाधीक आहे. तर आजवरच्या पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा १३ हजारांच्या पार गेल्याचे असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ३२१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ७९ रूग्ण हे जळगावात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल एरंडोल तालुक्यात ५१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ-१९; अमळनेर-१५; चोपडा-२०;पाचोरा-१८; धरणगाव-१८; यावल-९; जामनेर-१५; रावेर-६; पारोळा-३; चाळीसगाव-१८; मुक्ताईनगर-३६; बोदवड-१ व दुसर्या जिल्ह्यांमधील २ असे रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १३०८७ इतकी झालेली आहे. यातील ९१४५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच २०० रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ५८४ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ३३५८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.