साकेगावात तरूणावर भर दिवसा प्राणघातक हल्ला

शेअर करा !

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील एका तरूणावर सुर्‍याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, जय मुकेश ठाकूर या युवकावर आज सायंकाळी एकाने सुर्‍याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जय हा गंभीर जखमी झाला असून त्याला अत्यवस्थ अवस्थेत डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हल्लेखोराची ओळख पटली असून या बाबत तालुका पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!