जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही समाजकंटकांनी मिरवणूकीवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण केला होता. यात ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून ३२ जणांना अटक, तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना !
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावात तिथीप्रमाणे २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता इंदिरानगरातून शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक वराड गल्लीतील मशिदजवळून जात होती. त्यावेळी काही समाजकंटकांनी मिरवणूकीच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी मिरवणूकीत सहभागी झालेले नागरीक आणि बंदोबस्त ठेवणारे होमगार्ड हे जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिरसोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीसांचा कडक बंदोबस्त !
मिरवणूकीत दगडफेक केल्यामुळे शिरसोली गावात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सपोनि आसाराम मनोरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समाजकंटकांची पळापळ सुरूवात झाली. यात पोलीसांनी एकुण ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. यात ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल !
मेहमुद समसोद्यीन पिंजारी (वय-२४), जैनुद्दीन शेख निजामोद्यीन (वय-२४) साहिल शेख भिकन (वय-१९), शेरु शेख बिस्मील्ला (वय-३२), रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्दीन शेख (वय-२२), इब्राहीम शह मलंग शहा (वय-३५), तनवीर शेख सलीम (वय-१९), जुबेर शेख नबी (वय-३०), शहारुख शेख अल्लाउद्दीन (वय-२२), वसिमखान रहिम खान (वय-४०), आसिफ शेख इब्राहिम शेख (वय-२९), तन्वीर खान रहिम खान (वय-३४), फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख (वय-२०), अल्ताफ शेख बशिर (वय-१९), शेख तन्वीर शेख युनूस (वय-२२), शईद लतिफ पिंजारी (वय-३२), आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी (वय-१९), फरीद शहा फयाज शहा (वय-२९), कुरबान शेख गफुर (वय-१९), अशपाक इलीयाज पिंजारी (वय-२८), अबुजर हमीद खाटीक (वय-२४), सैय्यद उर्फ बबलु नुरअली, तौफिक रफिक मनीयार (वय-२३), दानिष सबदर खान (वय-२७), रेहान सादीक मनियार (वय-१९), फिरोज गफार सैयद (वय-२३), वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु (वय-२०), अशपाक सलीम पिंजारी (वय-१९), दानिश जाकीर पिंजारी (वय-२२), समीर नइमोद्दिन पिंजारी (वय-२६), अहमद मुबारक पिंजारी (वय-१९), अजिम शेख नाजीम (वय-१२) यांच्यासह इतर ४ अल्पवयीन मुले (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव) असे एकुण ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून उर्वरित ३२ जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
जखमी झालेल्यांची नावे !
मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय-२२), निलेश भगवान पाटील (वय-१९), विशाल दिलीप पाटील (वय-२५), मंगेश साहेबराव पाटील (वय-३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर असे सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिरसोली परिसरात तणावपुर्ण शांतता आहे. तरी देखील पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.