जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होमिओपॅथीचे जनक मास्टर सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त जळगाव शहरातील ‘ॲफोरिझम’ (Aphorism – Chapter II) संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, १० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवनमध्ये संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीपमाला काळे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून गोदावरी होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पराग भागवत हे देखील उपस्थित राहणार आहेत.

होमिओपॅथी शास्त्राचा प्रसार करणे आणि मास्टर सॅम्युअल हॅनेमन यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील महान कार्याचा गौरव करणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला होमिओपॅथी क्षेत्रातील डॉक्टर, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक टीम ‘ॲफोरिझम’चे डॉ. प्रणय वाणी, डॉ. कमलेश मराठे, डॉ. अपर्णा वाणी आणि डॉ. तृप्ती बढे यांनी केले आहे.



