जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३१३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगाव, अमळनेर यांच्यासह चोपडा, भडगाव आणि जामनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. आज २४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ३१३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६८ रूग्ण हे जळगाव शहरातील असून त्या खालोखाल अमळनेर-५३ तर चोपडा, जामनेर आणि भडगाव तालुक्यात प्रत्येकी २६ तालुक्यात रूग्ण संख्या वाढली आहे. तर उर्वरित जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१४, पाचोरा-३, धरणगाव-१२, यावल-१४, रावेर-२१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१२, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ५ असे एकुण ३१३ रूग्ण आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ३४६६, जळगाव ग्रामीण-६९२, भुसावळ-१०१७, अमळनेर-९५९, चोपडा-१०११, पाचोरा-५५५, भडगाव-६१३, धरणगाव-६३१, यावल-५२३, एरंडोल-७३०, जामनेर-९८४, रावेर-७६०, पारोळा-५६६, चाळीसगाव-६४१, मुक्ताईनगर-४२५, बोदवड-२५७, इतर जिल्हे-५७ असे एकुण १३ हजार ८८७ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १३ हजार ८८ इतकी झाली आहे. यातील ९ हजार ५८८ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच २४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६०१ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ६९८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.