Home Cities जामनेर सेवापूर्ती निमित्ताने छाया सूर्यवंशी यांना हृदयस्पर्शी निरोप सोहळा

सेवापूर्ती निमित्ताने छाया सूर्यवंशी यांना हृदयस्पर्शी निरोप सोहळा


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंबीलहोळ तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ. छाया गोरख सूर्यवंशी यांनी आपल्या सेवापूर्ती निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करत एक वेगळा आणि भावनिक उपक्रम राबवला. अनेक वर्षांच्या सहवासानंतर विद्यार्थ्यांपासून दूर जाण्याच्या क्षणी त्यांनी या अनोख्या पद्धतीने निरोप देत शिक्षक-विद्यार्थी नात्याची सुंदर परंपरा जपली.

आंबीलहोळ देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या छाया सूर्यवंशी या येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कारांचीही रुजवण केली. त्यामुळेच त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला भावनिक रंग चढला होता. विद्यार्थ्यांबरोबरचा जिव्हाळ्याचा संबंध कायम स्मरणात राहावा यासाठी त्यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच उत्साही बनवले. चिमुकल्यांच्या नृत्य, गीत आणि नाट्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात सर्वत्र आनंद, उत्साह आणि भावनांचा मिलाफ दिसून आला.

या सोहळ्याला जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनंदा पाटील, केंद्रप्रमुख पुखराज राठोड यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास चव्हाण, वसंत पवार, भानुदास चव्हाण, राजेश नाईक, ज्ञानदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील शिक्षक, पदाधिकारी, नातेवाईक, हितचिंतक, ग्रामस्थ आणि शाळेतील शिक्षक-शिक्षिका व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी छाया सूर्यवंशी यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी व्यक्त केली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound