पाचोऱ्यात रस्त्याचे झालेले क्राँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे – मा.आ.दिलीप वाघ (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 07 26 at 22.04.50

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील इंदिरानगर चौक आणि पुनगाव रोडवरील रस्त्याचे झालेले क्राँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. काँक्रिटीकरणाच्या कामात लाखो रूपयांचा चुराडा झाला असून या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी लेखीतक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अशी माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील इंदीरा नगर ते माजी आमदार दिलीप वाघ यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि पुनगाव रोड ते राजेश काळे यांच्या घरापर्यंत नगरपरिषदेने केलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरणा अतिशन निकृष्ट दर्जा असून या कामामुळे शासनाचे लाखो रूपयांचा चुराडा होत आहे. सदर रस्त्याचेकाम अंत्यत निकृष्ठ होत असल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेते संजय वाघ, स्थायी बांधकाम समिती सभापती भुषण वाघ, स्थायी पाणीपुरवठा समिती सदस्य रंजना भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखीतक्रार देवून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर रस्त्याचे काम रु.72 लाख 35 हजार 177/- व रु. 36 लाख 29 हजार 315/- अशा किंमतीने सर्वात कमी दराची निवीदा दाखवून मंजूर केले. याकामासाठी प्राप्त झालेल्या 4 निविदांपैकी सर्वात कमी दराच्या निविदेपेक्षा 9.99 टक्के जादा दराने मक्तेदारास मंजूरी दिली आहे. सदर रस्त्याचे काम करतांना मनमानी केली जात आहे. निविदा मंजूर करतांना कायदेशिर तरतुदी न पाळता पदा व अधिकाराचा दुरूपयोग करुन सदर निविदेची अमंलबजावणी केली जात आहे. यापुढील कामेही संभाव्य निवडणूक विचारात घेवून जादा दराने व घायी गर्दीने करुन जनतेच्यापैशांचा मोठया प्रमाणात अपव्यय होण्याचे प्रकार होतील तसेच मागील वर्षीही कोटयावधी रुपये खर्च करुन स्वच्छता अभियानाच्या नावाखाली पे ॲन्ड युज शौचालयाचे बांधकाम झाले यापैकी बरीच शौचालये आज बंद अवस्थेत आहे. याप्रकरणी देखील मोठया प्रमाणात जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी संजय ओंकार वाघ, सुचेता दिलीप वाघ, वासुदेव भिवसन माळी, विकास संतोष पाटील, भूषण दिलीप वाघ, शोक शंकर मोरे,रंजनाताई प्रकाश भोसले, निलीमाताई शरद पाटील, रणजीत अभिमन्यु पाटील (स्वि.सदस्य) यासर्व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी तक्रार दाखल केलेली आहे.

Protected Content