दुपारी १ वाजेपर्यंत जळगावमध्ये ३१.७०% तर रावेरमध्ये ३२.०२% झाले मतदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्र गाठत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात ३१.७०% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात ३२.०२% मतदान झाले आहे. यामधील जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव विधानसभा मतदारसंघ – 32.22 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 34.93 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 31.62 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 35.05 %, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 26.97 %, पाचोरा विधानसभा मतदारसंघ – 30.16 % मतदान झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघ -35.23 %, रावेर विधानसभा मतदारसंघ -31.29 %, भुसावळ विधानसभा मतदारसंघ -31.84 %, जामनेर विधानसभा मतदारसंघ – 29.56 %, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ -30.60 %, मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 33.65 % मतदान झाले आहे.

Protected Content