Home Cities जळगाव श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापनदिनीन विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापनदिनीन विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
150


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील डेंमला कॉलनी येथील श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी ११ डिसेंबर मोठ्या भक्तीमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. साईबाबांच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली होती.

वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सकाळी साईबाबांचे नामस्मरण, भजने आणि आरती उत्साहाने करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर साई नामाच्या गजराने दुमदुमला होता. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी रांगेत उभे राहून प्रसादाचा लाभ घेतला.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने अभिषेक करण्याची संधी डेंमला कॉलनीतील चेतन दिलीप तिवारी आणि त्यांच्या पत्नी दीपाली चेतन तिवारी यांच्या परिवाराला मिळाली. त्यांच्या हस्ते विधिवत अभिषेक संपन्न झाला. या सोहळ्यास शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेवक दीपमाला काळे, मनोज काळे, भास्कर विठ्ठल पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील आणि चेतन तिवारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी माजी मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, सरचिटणीस चेतन तिवारी, महिला मंडळाच्या डॉ. जुही विशाल भोळे, ललिता मनिष बाहेती, दीपाली चेतन तिवारी, आरती चेतन बांगर, अंकिता पंकज पाटील, दीप्तीताई चिरमाडे, अंजली देशपांडे या महिलांसह प्रभागातील सर्व नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबा मंदिर समितीतर्फे उपस्थित सर्व मान्यवर आणि भक्तांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भक्तांच्या सहकार्यामुळे हा वर्धापनदिन सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला.


Protected Content

Play sound