Home क्रीडा Sport News : खडसे महाविद्यालयाचे योगासन स्पर्धेत यश

Sport News : खडसे महाविद्यालयाचे योगासन स्पर्धेत यश


मुक्ताईनगर : येथील मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघाने जळगाव विभाग क्रीडा समितीच्या आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धेत यश मिळविले आहे. ही स्पर्धा मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे नुकतीच पार पडली.

आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धेत श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या महिला संघाने उपविजेतेपद तर पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळविला. महिला संघात अनिता विटोकार, राजनंदिनी पाटील , हर्षदा नागरूत .सुवर्णा मोरे, श्रुती बढे .मेघा वाढे यांचा सहभाग होता.

या संघातून अनिता विटोकार हिची जळगाव विभाग योगासन महिला संघात निवड झाली .तर पुरुष गटाने तृतीय क्रमांक घेतला. यात राहुल धुंदले, दीपक पाटील, नरेंद्र धनगर, प्रथमेश भास्कर ,सुमित कहाते यांचा सहभाग होता .खेळाडूंना क्रीडा संचालक प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रो.हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ.संजीव साळवे ,उपप्राचार्य वंदना चौधरी सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound