रावेर प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशन येथे कोरोना संदर्भात एक महिन्यात २९२ गुन्हे नोंदविण्यात आले असून (मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे) यासंदर्भात एकूण- 1,99,000 रुपयेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आज दि 13/4/2021 रोजी रावेर शहरातील नीरज परदेशी कोल्डिंक, डॉ आंबेडकर चौक येथे ग्राहकांना पार्सल न देता ग्राहकांची गर्दी होऊ दिली सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नसलेने Dysp नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शना नुसार एकूण 6000/-रुपयांची पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,हे कॉ भागवत धांडे यांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे,त्यामुळे दुकानदारांची धाबे दणाणले आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत असलेने सर्व व्यापारी,दुकानदार यांनी कोरोना RT-PCR तपासणी करून घ्यावी,सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे,सॅनिटायझर ठेवावे,मास्क असणे क्रमप्राप्त आहे,या पुढे दुकानावर गर्दी झाल्यास गुन्हये दाखल करून अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, शासनाने निर्गमित केलेले नियमाचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.