जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज २८३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आजच २६६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजच्या रिपोर्टमुळे जिल्ह्यातील आजवरच्या बाधीतांचा आकडा १२ हजारांच्या पार गेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची माहिती एका प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात आज २८३ नवीन बाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा-३४ व जळगाव ग्रामीण-३३ रूग्ण आढळले आहेत.
उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, भुसावळ-३; अमळनेर-२४; चोपडा-२०; पाचोरा-२; भडगाव-३; धरणगाव-४; यावल-१३; एरंडोल-२२; जामनेर-२४;रावेर-६; पारोळा-५; चाळीसगाव-१; व मुक्ताईनर-१४ असे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आजच्या रिपोर्टचा आकडा पकडून जिल्ह्यातील आजवर कोरोना बाधीतांची संख्या १२,०३६ इतकी झाली असून यातील ८४६९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३०१८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.