यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल वनविभागाच्या क्षेत्रातील वैजापूर सहपरिमंडळा बोर अजंटी गावाजवळ वनविभागाने कारवाई रत एकुण २८ हजार ५६४ रूपये किंमतीचे सागवान कट साईज लाकूड जप्त करण्यात आले आहे.
यावल वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर सहपरिमंडळा बोर अजंटी गावाजवळून मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाने कारवाई करत सागवान लाकडून कट साईज ७९ घनमीटर ०, ६६४ माल किंमत २२ हजार ८६३ रूपये सागबल्ली नग ०९, माल किंमत२७०० रू, खाट तयार माचे ०४ माल किंमत ८०० रू, कटर मशीन ०१ किंमत १००० रू, रंधा मशीन ०१ किंमत १ooo रू, गिरमिट ०२, किंमत २०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २८ हजार५६४ रुपयांचा असून सर्व मुद्देमाल वनपरिक्षेत्र चोपडा आगारात जमा करण्यात आला.
सदर कार्यवाही बाबत वनरक्षक बोरअजंटी यांनी गुन्हा नोंदवलेला असून पुढील तपास व चौकशी वनपाल बोरअजंटी करत आहेत. ही कारवाई वनसंरक्षण धुळे म.निनु सोमराजख, जमीर मुनीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,म.सदगिर सर विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे,प्रथमेश व्ही.हाडपे,सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान एम.सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाहीत वैजापूर वनक्षेत्रातील पथक व येथील सर्व अधिकारी,वनमजूर व वनकर्मचारी वनसेवक यांच्या उपस्थितीत होते.