पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात आज घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये तब्बल २७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात पहूर येथील एकाच घरातील पाच जण बाधीत असल्याचेही आज दिसून आले आहे.
पहूर येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्ग आज दि. २१ रोजी घेण्यात आलेल्या ९९ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टस् पैकी २७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर ७२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ . हर्षल चांदा यांनी दिली .
दरम्यान पहूर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा तपासणी अहवाल काल सायंकाळी पॉझीटिव्ह आला होता. आज पहूर येथे रॅपिड अॅन्टीजेन टेस्टस् मध्ये या लोकप्रतिनिधी च्या घरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पहूर येथील कोरोना बाधितांची संख्या तब्बल ६८ झाली आहे.
बाधितांची संख्या खालील प्रमाणे – ( एकूण – २७ )
पहूर पेठ -५
शेंदूर्णी – ३
पाळधी – ८
वाकोद -९
लोहारा – १
जांभूळ -१
रॅपिड अँटीजन टेस्ट कामी डॉ. हर्षल चांदा, डॉ. पुष्कराज नारखेडे, डॉ. संदीप कुमावत, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. कुणाल बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील चौधरी, देवेंद्र घोंगडे ,प्रदीप नाईक ,संजय सरपटे, अशा सेविका तसेच वैद्यकीय यंत्रणेसह पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.