जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात कोविड लसीकरण सुरु आहे. शहरातही आज भाजप ओबीसी मोर्चा, भावसार क्षत्रिय समाज, जीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीर भावसार मंगल कार्यालयात संपन्न झाले. या शिबिरात २५० नागरिकांनी लसीकरण करून घेत स्वतःला कोरोना महामारीपासून संरक्षित करून घेतले.
आज, बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी माजी महापौर सीमा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, भावसार क्षत्रिय समाज अध्यक्ष अशोक भावसार, भाजप ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष जयेश भावसार यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिबीर घेण्यामागील उद्देश भावसार समाज अध्यक्ष अशोक भावसार आणि जयेश भावसार यांनी स्पष्ट केला.
कोरोना महामारीमुळे समस्त मानवजातीला मोठ्या हानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र लसीकरणामुळे नागरिकांचे प्राण वाचण्यात मोठे यश भारताला मिळाले आहे. प्रत्येक नागरिकांनी लसीकरणाचे तिन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घ्यावे, असे प्रतिपादन माजी महापौर सीमा भोळे यांनी केले.
माजी नगरसेवक किशोर चौधरी यांनीही, सर्वानी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करा असे सांगितले. प्रसंगी परिचारिका आफरीन काझी, अर्चना गवळी, भाग्यश्री सूर्यवंशी, रुपाली बाविस्कर, प्रतिभा काळे, मनीषा पाटील यांनी लसीकरण शिबिरासाठी सहकार्य केले.
शिबिरासाठी भावसार समाज सचिव शैलेश पांडे, भाजप ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, अपंग आघाडी महानगराध्यक्ष गणेश वाणी, विलास जुनागडे, अनिल भावसार, अनिरुद्ध भावसार, अभिलाष भावसार, सतीश भावसार, प्रितेश भावसार, मंगेश जुनागडे, योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.