जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील पिपल्स बँकेजवळून एका तरूणाच्या खिश्यातून २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरूवार १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश वासुदेव महाजन वय २० रा. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते डेली सर्व्हिस गाडीवर चालक म्हणून काम पहातात. गुरूवार १ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील दाणाबाजार आवारातील पिपल्स बँकेजवळ असलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाकिटात ठेवलेले २५ हजारांची रोकड चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली परंतू कोणती माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ८ वाजता त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.