अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील राम मंदिरात आणखी 25 मूर्ती बसवण्यात येणार आहेत. त्यात श्री राम दरबार, सप्तर्षी, शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. पहिल्या माळ्यावर ही शिल्पे बसवण्यात येणार आहेत. रामचरित मानसचे लेखक गोस्वामी तुलसीदास यांची मोठी मूर्तीही बसवण्यात येणार आहे, मात्र त्यांचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी त्यांनी सांगितले – राम मंदिर 221 फूट उंच असेल. मंदिराचे मुख्य शिखर 161 फूट उंच असेल. त्यावर 50 मीटर उंच ध्वजस्तंभ असेल. हा दंड गुजरातमधून तीन महिन्यांपूर्वी अयोध्येत आणण्यात आला होता. डिसेंबर 2024 पर्यंत राम मंदिर तयार व्हावे, यासाठी ट्रस्टचा प्रयत्न आहे. तसेच संपूर्ण मंदिर संकुलाचे बांधकाम 2025 च्या अखेरीस पूर्ण झाले पाहिजे.