भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव येथील सेन्ट्रल बॅक गोळीबारातील त्या गंभीर जखमींना प्रत्येकी 25 लाखांची मदत करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांनी दि. 22 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले असून मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने बँकेसमोर धरणे मोर्चा-आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, वरणगाव येथील सेन्ट्रल बॅकमध्ये सुरक्षा रक्षकाच्या हलगर्जीपणामुळे चार बॅक धारकांना सुरक्षा रक्षकांच्या हाती असलेल्या बंदुकीने गोळी सुटल्याने चार बॅक धारक गंभीर घायल झाले. सेंन्ट्रल बँक यांनी प्रत्येकी घायल व्यक्तींना 25 लाखांची मदत करण्यात यावी, याचबरोबर घायल कुटुंबातील एका व्यक्तींना सेंन्ट्रल बॅकेच्या कुठल्याही शाखेत नौकरी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी
कॉंग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यापुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने सेंन्ट्रल बँकेसमोर धरणे मोर्चा आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.