केंद्राकडून आरएसएस प्रमुखांना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. भागवतांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र अचानक सुरक्षेत वाढ का करण्यात येत आहे, याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून एडवान्स सिक्युरिटी लाइजन पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही इतकीच सुरक्षा दिली जात आहे.

टीओआयच्या सूत्रांनुसार, भागवतांच्या सुरक्षेच्या समीक्षेनंतर ही वाढ करण्यात आली आहे. कथितपणे भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्य असलेल्या राज्यांमध्ये भागवतांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत काही कमतरता आढळली होती. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भागवत हे अनेक कट्टरपंथी मुस्लीम संघटनांसह अनेक संघटनेंच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

Protected Content