धरणगाव तालुक्यात वाढला कोरोनाचा संसर्ग; २२ नवीन बाधीत

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात आज २२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात शहरातील १३ रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये धरणगाव तालुक्यात एकूण २२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात धरणगाव शहरातील १३; बांभोरी प्रचा येथील ६ तर बांभोरी येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. शहराचा विचार केला असता, चिंतामण मोरया परिसर-४; कासार गल्ली-२; खत्री गल्ली-२ आणि महावीर नगर, गुजरात गल्ली, हेमाइंदू नगर आणि वाणी गल्ली भागातील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, आजच्या रिपोर्टनंतर तालुक्यातील आजवरच्या एकूण कोरोना बाधीतांची संख्या २८२ इतकी झाली आहे. यात १९ जणांचा मृत्यू झाला असून १५८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १०४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content