दुचाकीवरून घसरून २१ वर्षीय तरुण ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील रोजोदा ते खिरोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. मयत तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.तर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात अपघाताच्या नोंदणीची कार्यवाही सुरू होती.

रावेर तालुक्यातील खिरोदा ते रोझोदा या रस्त्यावर रोझोदा गावाच्या जवळ स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी क्रमांक एम. एच. १९ इ. एच. ८३२१ द्वारे देवेंद्र राजेंद्र कोळी वय २१ वर्षे रा. रोझोदा हा तरुण न्हावी गावाकडे जात होता दरम्यान त्याची दुचाकी घसरली आणि त्याच्या डोक्याला दगड लागुन दुखापत झाली. त्याला तातडीने तेथून सावदा व नंतर भुसावळ येथील रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा जख्मी असलेल्या तरूणाला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आणले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून अपघातात जखमी देवेन्द्र कोळी या तरुणास मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत या अपघात संदर्भात पोलिसांच्या वतीने सदरच्या अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content