२०३४ चा फिफा विश्वचषक सौदी अरेबियात होणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २०३४चा फुटबॉल विश्वचषक सौदी अरेबियात खेळवला जाणार आहे. एवढेच नाही तर २०३० च्या विश्वचषकाचे आयोजन स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे करणार आहे. जागतिक फुटबॉल नियामक मंडळ फिफाने बुधवारी रात्री याची घोषणा केली.

२०३४च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी फक्त सौदी अरेबियाने बोली लावली होती. अशा परिस्थितीत झुरिचमध्ये जागतिक संघटनेच्या विशेष बैठकीनंतर अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी सौदी अरेबियाला अधिकृत यजमान म्हणून घोषित केले.

पुढील फुटबॉल विश्वचषक २०२६ मध्ये होणार आहे. याचे आयोजन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करत आहेत. यापूर्वी १९३० मध्ये उरुग्वेने विश्वचषकाचे आयोजन केले होते. २०३० च्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचे आयोजन केले जाईल. उद्घाटन सोहळाही याच देशात होणार आहे. उरुग्वे व्यतिरिक्त, अर्जेंटिना आणि पॅराग्वेदेखील २०३० च्या विश्वचषकातील प्रत्येकी एक सामना आयोजित करतील.

Protected Content