बोगस पिक संजीवके औषधांचा २ लाख ४ हजाराचा साठा जप्त

 विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस  न्यूज प्रतिनिधी । बिना परवाना बी.टी. स्पेशल पिक संजीवक औषध तयार करून विक्री करत असलेल्या विक्रेत्याच्या जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील धनश्रीनगरातील घरावर पोलिसांनी शनिवार, २२ जुलै रोजी छापा टाकून सुमारे २ लाख ४ हजाराचा औषध साठा जप्त केला.

 

मुळ चोपडा तालुक्यातील  चुंचाडे  येथील संजय -संतोष बेलदार हा त्याच्या धनश्रीनगरातील घरात हे औषध बनवित होता. याबाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना ही गोपनीय माहिती- मिळाली होती. त्यानुसार कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक  विकास बोरसे , मोहीम अधिकारी विजय पवार यांची मदत घेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय पाटील, सचिन महाजन , दर्शन ढाकणे यांच्या  पथकाने शनिवारी धनश्री नगर येथे संजय बेलदार यांच्या घरी छापा टाकला आणि ही कारवाई केली. याठिकाणी औषधाची केळी व कपाशीच्या पिकावर फवारणीसाठीचे विना परवाना असलेला बी.टी.स्पेशल पिक संजीवक, कृषी ह्युमस संजीवक असा सुमारे ३९० लिटरचे एकूण रक्कम २ लाख ४ हजाराचा साठा पोलिसांनी जप्त केला. तपासणीसाठी सदर औषधींचे नमुने घेण्यात आले आहे. याबाबतची पुढील कारवाई जिल्हा कृषी विभाग करत आहे.

Protected Content