भुसावळातील महिलेची २ लाख २९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील बीपीसी बँक कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका ॲपच्या माध्यमातून एकूण २ लाख २९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडली होती. अखेर चौकशी अंती भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील बीपीसी बँक कॉलनी शुभांगी सिद्धेश पाटील वय-५६ या महिला वास्तव्याला आहे. दरम्यान ९ जून रोजी दुपारी दीड वाजता त्यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला. त्यावर त्यांनी सांगितले की आपण एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत आहे, तुम्हाला तुमचे परत पैसे मिळण्यासाठी एक ॲप पाठवत आहे, ते डाऊनलोड करून त्यात डिटेल भरा असे सांगितले. त्यावर शुभांगी पाटील यांनी विश्वास ठेवून संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खातून २ लाख २९ हजार रुपये काढून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली. दरम्यान याबाबत चौकशी अंती अखेर गुरुवारी २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहे.

Protected Content